धाराशिव | महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांच्या कडून श्रीतुळजाभवानी मातेची अभिषेक महापूजा


फेब्रुवारी महिन्यात अहिल्यानगर येथे रंगलेल्या प्रतिष्ठेच्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज मोहोळ यांनी आज सायंकाळी श्री तुळजाभवानी देवींची अभिषेक महापूजा केली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला पराभूत करत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळ ने ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पृथ्वीराज मोहोळ हे आज पहिल्यांदाच आपल्या कुटुंबीयासमवेत श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनाला आले होते.
          
मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा तुळजाभवानी देवींची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जनसंपर्क अधिकारी गणेश निर्वळ, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रशांत जाधव, सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पाटील, श्रीकांत पवार, ऋषभ रेहपांडे, स्वच्छता निरीक्षक मनोज घोडगे, सुमित रघुजीवार, पवन पांडे व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments