करमाळा |
तालुक्यातील वाशिंबे गावातील ऍड. योगेश झोळ यांनी ऑल इंडिया बार असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सुयश मिळवले आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना तालुक्यापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत कुठेही अधिकृत प्रॅक्टिस करता येणार आहे. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत यश मिळवल्यामुळे यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
वाशिंबे येथील ऍड योगेश झोळ यांना ऑल इंडिया बार कौन्सिलची सनद मिळाली आहे. त्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण वाशिंबे येथील शरदचंद्रजी पवार विद्यालयामध्ये झाले तसेच वकिलीचे शिक्षण यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे येथून झाले सध्या ते शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालय पुणे येथे प्रॅक्टिस करत आहेत. प्रगतशील शेतकरी भास्कर झोळ यांचे ते चिरंजीव आहेत.
0 Comments