धाराशिव |
माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज ८ मार्च रोजी तुळजापूर येथे आई श्री तुळजाभवानी देविजींचे दर्शन घेतले व मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाची पाहणी करून मंदिर प्रशासकीय ईमारतीच्या सभागृहात पुरातत्त्व विभागाकडून करण्यात येत असलेल्या मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या विकास कामांचा आढावा घेतला.यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील,पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे,छत्रपती संभाजीनगर विभागाच्या पुरातत्वच्या सहायक संचालक जया वाहणे व अमोल गोटे,पुरातत्व तज्ञ व सल्लागार तेजस्विनी आफळे व तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मंत्री ॲड.श्री.शेलार यांनी पुरातत्व विभागाकडून मंदिराचे जतन व संवर्धनाची सुरू असलेल्या विकासकामांची माहिती जाणून घेतली व याबाबतचे सादरीकरण बघितले.दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला मंदिरात येत असल्यामुळे मंदिराच्या जतन व संवर्धनाची कामे दर्शनात कोणतेही अडचण येऊ न देता गतिमानतेने करावी असे निर्देश ॲड.श्री.शेलार यांनी पुरतत्व विभागाला यावेळी दिले.
पुरातत्त्व विभागाच्या तज्ञ अधिकाऱ्यांनी येत्या पंधरा दिवसात कळसाची पाहणी करावी व त्यानंतर त्यांच्या अहवालानुसार सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल असे सांगून ॲड.श्री.शेलार म्हणाले,मंदिराचे जतन व संवर्धनाची विकास कामे सुरूच ठेवावी. भाविकांच्या भावना लक्षात घेऊन मंदिर परिसरातील उर्वरित काम सुरूच आहे. पुरातत्व विभागाची कार्यपद्धती ही आंतरराष्ट्रीय मानकानुसार आहे.मंदिराच्या जतन व संवर्धनाबाबत मोठ्यांपासून ते सर्वसामान्य भाविकांनी केलेल्या सूचनाही राज्य सरकार विचारात घेणार असल्याचे ॲड.श्री.शेलार यावेळी म्हणाले.
आमदार राणा जगजितसिंह पाटील म्हणाले,पुरातत्व विभागाने मुख्य मंदिराचे कामे सोडून इतर कामे पूर्ण करावी.आठ महिन्यात तयारी पूर्ण करून त्यानंतर सहा महिन्यात कामे पूर्ण करावी.कळसाच्या वरच्या भागाला सोन्याचा मुलामा देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
0 Comments