- सुनिल दळवी (वाकीघोलकर) मो. ९८८१४८५१६५
धामणी खोऱ्यात परवा आमदार साहेबांसोबत बहुचर्चित धामणी मध्यम प्रकल्पाच्या घळभरणी कार्यक्रमाप्रसंगी जाण्याचा योग आला. गेली १० वर्ष आमदार म्हणून काम करत असताना या माणसाने केलेल्या सेवेचा मी साक्षीदार आहे. धामणी प्रकल्पाचा बहुतांश लाभ 'राधानगरी गगनबावडा, पन्हाळा , करवीर' या तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना होणार आहे. हजारो शेतकऱ्याची कुटूंबे स्वावलंबी आणि समृद्ध होणार आहेत. हा महत्वपूर्ण प्रकल्प मार्गी लागण्यासाठी स्वर्गीय पी. एन. पाटील साहेब, आमदार विनय कोरे साहेब, माजी आम .आमदार चंद्रदीप नरके साहेब यांसह जिल्ह्यातील अनेक नेत्यांचं सहकार्य लाभलं. उर्वरित महत्त्वपूर्ण काम हे आमदार प्रकाशरावजी आबिटकर साहेबांच्या योगदानातून पूर्णत्वाकडे जात आहे याचा मनस्वी आनंद आहे.
जवळजवळ ४ टीएमसी प्रकल्पातील फक्त ७ गावे साहेबांच्या विधानसभा मतदारसंघातील आहेत, उर्वरित संपूर्ण लाभ इतर तालुक्यांना होणार आहे. तस राजकियदृष्ट्या मतांच्या गोळाबेरीजेतून पाहिलं असतं तर साहेबांनी इतकं झोकून देऊन पूर्णत्वाकडे नेण्याची काही एक गरज नव्हती, पण शेतकरी, कष्टकरी तो माझ्या मतदारसंघातील असो अथवा इतरत्र कुठल्याही पण माझ्या काही योगदानामुळे त्यांच्या आयुष्यात सुखाची पालवी फुटणार असेल तर मी नेहमीच अशा गोष्टींना प्राधान्य देईल, असं साहेबांच मत. काम '' माणसाच्या शाश्वत हिताचं असेल, ते काम पूर्ण करण्यासाठी स्वतः च समर्पण या माणसानं निर्मळ मनानं कायमस्वरूी दिलेलं आहे, याचे साक्षीदार आमच्या सारखे असंख्य तरुण आहेत. आज साहेबांची ओळख मतदासंघातील अशा या अनेक 'शाश्वत कामांच्या' माध्यमातून, स्वतःच्या कार्य-कर्तुत्वाच्या जीवावर केली. बहुप्रतिक्षित रखडलेल्या धामणी मध्यम प्रकल्पाच्या आजच्या पूर्णत्वाकडील वाटचालीमुळे, आज आमदारांची ओळख ही तीन - चार तालुक्याबरोबरच जिल्ह्याला आणि परिणामी समस्त मायबाप जनतेला अभिमान वाटेल अशी झाली, आणि प्रत्येकाच्या हृदयात घर करून बसली.
या कामाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी एक प्रसंग मला इथे सांगावा असं वाटतो. तो म्हणजे या कामाच्या घळभरणी प्रसंगी तब्बल "तीन ते साडेतीन तास" धामणी खोऱ्यात धो-धो पाऊस पडत असताना, तीन चार तालुक्यातील हजारो लोकांनी अक्षरशः भर पावसात बसून या ऐतिहासिक कामाचं स्वागत केलं. अंगावर काटा आणणार हे दृश्य होत, इतका धो-धो पाऊस पडत होता, पण प्रकल्पपूर्ती च्या भावनेनं बसलेला प्रत्येक जण मनोमन सुखवला होता. ४० वर्ष रखडलेल्या या प्रकल्पासाठी सातत्याने शासन दरबारी प्रश्न मांडणाऱ्या, पुढच्या अनेक पिढ्यांच्या आयुष्याचं सोनं करणाऱ्या या महत्त्वकांक्षी धामणी प्रकल्पासाठी इथली जनता उभ्या पावसात तब्बल ३ ते ३.३० तास भिजत होती, हीच खरी पोचपावती होती साहेबांच्या कामाची. हे सगळ माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी थक्क करणारं होत, एखादं विधायक आणि लोकहिताचं काम केल्यानंतर मायबाप जनतेचे "प्रेम, आशीर्वाद, आणि पुण्य" कशा पद्धतीने लाभतं, याची अनुभुती येत होती.
बाकी साहेब वारंवार हेच सांगतात, की सुनीलराव "जे कोणी केलं नाही, ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत आहे." हे कुणाच्या पण नशिबात नसत. ही पुण्याईची काम आहेत, हे करण्याचं भाग्य माझ्यासारख्या लोक्रतिनिधींच्या नशिबी आलं हे मी माझं भाग्य समजतो.
"पक्ष, सत्ता, राजकारण" होत राहील, पण माझ्या या महत्वपूर्ण कामामुळे इथल्या अनेक पिढ्या आयुष्यभरासाठी सुखावतील, त्यांच्या चेहऱ्यावरचा "आनंद, समाधान" हे मला कायमस्वरूपी प्रेरणा देत राहील. हेच मिळवायचं असतं लोकप्रतिनिधी बनून, ज्यासाठी या लोकांनी मला निवडून दिलं, माझ्यावर विश्र्वास टाकला.
इतकी प्रांजळ भावना, स्पष्ट भूमिका घेऊन काम करणारा कृतिशील लोकप्रतिनिधी राधानगरी मतदारसंघाला मिळाला, हे इथल्या मतदारसंघाबरोबरच आमच्यासारख्या असंख्य तरुणांचं भाग्य.
0 Comments