धक्कादायक! जन्मदात्याकडून पोटाच्या मुलीवर ४ वर्षांपासून अत्याचार


डहाणू तालुक्यात वडिलांकडून पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २०२० पासून वडिलांकडून मुलीवर अत्याचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

पोलिसांकडून शाळा महाविद्यालयात सुरू असलेल्या लैंगिक जनजागृती कार्यक्रमानंतर विद्यार्थिनीने आपल्या शिक्षिकेकडे या घटनेची माहिती दिली. या प्रकरणी बुधवारी (दि. ९) डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डहाणू तालुक्यातील एका निवासी शाळेत शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय मुलीवर वडिलांकडून ४ वर्षांपासून अत्याचार सुरू असल्याचा आरोप मुलीने केला आहे. शाळेत शिकणारी मुलगी सुट्ट्यांमध्ये घरी गेल्यावर वडील तिच्यावर अत्याचार करत असून यंदा गणपतीच्या सुट्टीत मुलगी घरी आल्यावर देखील वडिलांनी मुलीवर अत्याचार केल्याचे मुलीने तक्रारीत सांगितले आहे. शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थिनीला विश्वासात घेत या प्रकरणाची अधिक माहिती घेऊन पोलिसांना कळवले.

Post a Comment

0 Comments