धाराशिव |
शहरातील रामानंद महाराज विद्यामंदिर काजळा येथील खेळाडू सोमनाथ ससाने याने जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत उंच उडी प्रकारात व आकांक्षा माळीने 100 मीटर हार्डल्स मध्ये अव्वल क्रमांक पटकावला आहे. व पूजा राठोड 19 वर्ष 100 मीटर हायडल्स मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. आकांक्षा माळी 400 मीटर हायडल्स यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने तुळजाभवानी क्रीडा संकुल येथे या स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत सोमनाथ ससाणे सर्वोच्च उंच उडी मारून प्रथम क्रमांक, आकांक्षा माळी 100 मीटर हार्डल्स प्रथम पूजा राठोड 110 मीटर हार्डल्स द्वितीय अंकिता माळी 400 मीटर हर्डल्स वैष्णवी शिरसागर गोळा फेक तृतीय मिळवला त्याची नांदेड येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली या स्पर्धेत सुमारे 240 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता उंच उडी या क्रीडा प्रकारात जिल्ह्यातील एकूण सोहळा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
या यशाबद्दल रामानंद हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री वागदकर सर,श्री पवार पी जे सर, श्री सोनवणे सर, प्रा मालोजी पवार , प्रा युवराज जाधव ,खैरुद्दीन सय्यद ,रमाकांत वाघमारे, श्री पवार आर डी सर, सरपंच पवन प्रवीण पाटील उपसरपंच जिजाबाई मडके संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे ,अजीम सेवक श्रीराम साळुंखे, अरुण सुळगेकर सर, जयसिंगराव देशमुख, बाळासाहेब मडके, राजू पवार, ,किशोर क्षीरसागर , प्रदीप आप्पा शेळके, संतोष आप्पा पवार ,विजय दत्त पाटील, बाळूमामा मडके यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले. या विद्यार्थ्याला क्रीडा शिक्षक श्री संतोष राठोड सर त्यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments