‘या’ महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता जमा!


 राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलाना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे तीन हप्ते देखील महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. अशातच आता राज्य सरकारकडून या योजनेच्या अंतर्गत दिवाळीनिमित्त भाऊबीज दिली जाणार आहे. आजपासून म्हणजेच 10 ऑक्टोबरपर्यंत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन हप्त्यांचे पैसे दिले जाणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आले होते.

लाडक्या बहिणींच्या खात्यात भाऊबीजेची ओवाळणी जमा :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना 10 ऑक्टोबरपर्यंत हे पैसे दिले जाणार होते. परंतु राज्य सरकारने ठरलेल्या तारखेच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात भाऊबीजेची ओवाळणी जमा करायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार, या योजनेचे जुलै महिन्यापासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीला या योजनेकरता अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती.


मात्र त्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली होती. मात्र अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या वाढत गेल्याने व काही तांत्रिक अडचणींमुळे अर्ज करण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवली होती. त्यामुळे आता तब्बल दोन कोटींहून अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

दरम्यान, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचा सन्मान निधी महिलांच्या खात्यावर जमा झाला आहे. मात्र आता नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळी हा सण असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्रितरित्या जमा होणार होईल सुरवात झाली आहे. मात्र कित्येक महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही हे लक्षात येत नाही.


त्यासाठी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्यास तुम्हाला तत्काळ बँकेकडून लिंक असलेल्या मोबाईलवर त्यासंदर्भात मेसेज केला जात आहे. तसेच जर, तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांत पहिल्यांदा बँकेत जाऊन तुमचं खातं आधार कार्डशी लिंक करून घेणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments