बार्शी |
30 सप्टेंबर, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली आज बार्शी ते धाराशिव रस्त्यावरील चिखर्डे येथील बस स्थानक चौकामध्ये सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी तालुकाध्यक्ष शरद भालेकर, रयत क्रांती संघटनेचे सचिन आगलावे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रामराव काटे, जिवन गावडे, पोपट पवार, लक्ष्मण भोसले, छोटू कोंढारे, हनुमंत हाके, प्रदीप कोंढारे, दादा कुठले, अमर कोंढारे, बाप्पा कोंढारे, राहूल कोंढारे, स्वप्निल कोंढारे, नंदकुमार गिरमकर, अमर पाटील आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
सन 2023 खरीप व रब्बी उर्वरित तसेच चालू खरिपाचा पिकविमा द्या, पिकविमा सॅम्पल सर्वे न करता वैयक्तिक पंचनामे करून मिळावा, चालू खरिपाचे पावसामुळे नुकसान झाल्यामुळे फळबागेसह सर्व पिकांची उर्वरित सर्व मंडळांना सरसकट नुकसान भरपाई द्या, राहिलेले कांदा अनुदान द्या, शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावीत, सर्व शेतकरी नेत्यांच्या संपत्तीची चौकशी करावी इत्यादी मागण्यासाठी हा रस्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांना शंकर गायकवाड, शरद भालेकर व रामराव काटे यांनी मार्गदर्शन केले.
मागण्यांचे निवेदन बार्शी तहसीलचे प्रतिनिधी, नारी मंडळ अधिकारी मेघना राजपूत यांना देण्यात आले. या आंदोलनाचा चोख पोलीस बंदोबस्त पीएसआय प्रतापसिंह जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठेवला होता..
या आंदोलनातील मागण्यांची पूर्तता लवकरच केली नाही तर पिकविमा कंपनीसह कृषी आयुक्तालय व संबंधित मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहोत. --शंकर गायकवाड (राज्याध्यक्ष, शेतकरी संघटना)....
0 Comments