दिपीकाने दिला बाळाला जन्म? सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल


बाॅलिवूडमधील कायम चर्चेत असणारी अभिनेत्री दिपीक पदुकोणने आपल्या सौंदर्याने आणि उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. काही महिन्यांपूर्वी दिपीकाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ती आई होणार असल्याची गुड न्यूज तिच्या चाहत्यांसाठी दिली होती. दिपीकाला कधी बाळ होणार याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं असताना सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्याची सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे.

काही महिन्यांपूर्वी दिपीका आणि रणवीर यांनी आई बाबा होणार असल्याचं सोशल मीडियावर सांगितलं होतं. दरम्यान आता सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दिपीकाने एका गोंडस चिमूकल्याला जन्म दिल्याचं दिसत आहे. याशिवाय रणवीरने देखील या लहान बाळाला आपल्या हातात घेतल्याचं दिसत आहे.

माॅर्फ्ड फोटो व्हायरल?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमुळे काहीजणांना ही बातमी खरी वाटत आहे. मात्र, हा फोटो फेक असून, या फोटोला मॉर्फ्ड करण्यात आलं आहे. शिवाय या फोटोमध्ये काही तथ्य नाही. मात्र, तरी सुद्धा हा फोटो तूफान व्हायरल झाला आहे. सध्या सोशल मीडियावर या फोटोची चर्चा आहे. दिपीकाने तिच्या अधिकृत अकाउंटवर शेअर केलेल्या बातमीनूसार सप्टेंबर महिन्यात ती बाळाला जन्म देणार असल्याचं म्हटलं आहे.

अनंत-राधीकाच्या लग्नात एकत्र-
आपल्या चाहत्यांसाठी दोघे सुद्धा आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन नवनवीन फोटो शेअर करत असतात. दीपिका  आणि रणवीरची फॅन फॉलोइंग सुद्धा वाढताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी रणवीर आणि दीपिका या दोघांनी देखील अनंत- राधीकाच्या लग्नात हजेरी लावली होती.

Post a Comment

0 Comments