चंद्रपूर जिल्ह्यात एमबीबीएस तरुणीने वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. ईशा बिंजवे (२४) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. ब्रम्हपुरी शहरातील रहिवासी असलेल्या ईशाने संध्याकाळच्या दरम्यान चंद्रपूर-गडचिरोली सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत उडी घेतली.
मात्र नदीत ज्या ठिकाणी उडी घेतली त्या ठिकाणी पाणी कमी असल्याने तिचा पहिला प्रयत्न फसला. मात्र या तरुणीने जास्त खोल पाणी असलेल्या ठिकाणी पुन्हा उडी घेतली. पिंपळगाव जवळच्या नदी पात्रात मृतदेह आढळून आला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.
ईशाचे आई-वडील दोन्ही होमियोपॅथी डॉक्टर असून ब्रम्हपुरी शहरात त्यांचा दवाखाना आहे. पुलावरून जाणाऱ्या अनेक लोकांनी ही घटना मोबाईल मध्ये शूट केली. याचे व्हिडीओ वायरल झाले आहेत. ईशा एमबीबीएस असून तिने मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वैनगंगा नदीन आत्महत्या करण्यासाठी उडी मारली. पहिल्यांदा उडी मारली तेव्हा पाणी कमी असल्याने ती वाचली. मात्र, त्यानंतर पुन्हा तिने खोल पाण्यात उडी घेत जीवन संपवलं. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
0 Comments