मंगळवेढा |
शेतकरी हा पूर्वापार चालत आलेल्या चुकीच्या व शेतीविरोधी धोरणामुळे आज पर्यंत कोट्यावधी रुपयाला लुटला गेल्यामुळे वरचेवर तो कर्जबाजारी होऊन, आजपर्यंत चार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या व अजूनही राज्यामध्ये दररोज दिवसाला सरासरी सहा शेतकरी आत्महत्या करत असताना त्या थांबवण्यासाठी शेती विरोधी धोरणे व कायदे रद्द करून शेतकऱ्यांची दरवर्षी होणारी लाखो रुपयांची लूट बंद केल्यास सरकारची लाडकी बहीणच सरकारला दरवर्षी परदेशी शेतकऱ्याप्रमाणे लाखो रुपयाचा टॅक्स देण्यास सक्षम करणे गरजेचे असताना सरकारने मात्र लाडक्या बहिणीला दीड हजार देऊन, तिच्या नवऱ्याच्या हातात इंड्रेलचा डबा देऊन, मेव्हण्याला फासावर चढवणे कितपत योग्य आहे, अशी जहरी टीका शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी खोमनाळ, तालुका मंगळवेढा येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यानंतर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली.
यावेळी शेतकरी संघटनेच्या सोलापूर युवा जिल्हाध्यक्षपदी औदुंबर मोरे यांची नियुक्ती देखील करण्यात आली. त्यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर हेंबाडे, तुकाराम इंगवले, सिद्धार्थ काकणकी, राजू मदने, सुधीर बिले, रावसाहेब बिले, अशोक पवार, विठ्ठल इंगळे, अण्णा वाकडे, विजय मोरे, विष्णू पवार, हरी बिले, अण्णा इंगळे, कुशाराम पवार, किसन सोनवणे, संजय शेळके, विलास खांडेकर आदींसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
लाईटबिल, ऊसबिले, पिकविमा, तसेच शेतीविषयक सर्व समस्याविषयी हा मेळावा घेण्यात आला होता.
0 Comments