शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17 व्या हप्त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूरी दिली होती. आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांची रक्कम जमा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी योजनेचा 16 वा हप्ता या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जमा केला होता. यवतमाळ-नागपूर रस्त्यावरील भारी येथे कार्यक्रमात त्यांनी एक बटण दाबून हा पैसा हस्तांतरीत केला होता.
आता लवकरच 17 वा हप्ता (PM Kisan ) जमा होणार आहे. शेतकऱ्यांना हा हप्ता कधी जमा होणार, याची प्रतिक्षा होती. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 18 जूनला पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता जमा होणार असल्याचं म्हटलं जातंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी दौऱ्यावर जाणार आहेत. या हप्ता जमा होईल, अशी माहिती आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता त्या शेतकऱ्यांना मिळेल, ज्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत असेल. आता हे कसं चेक करायचं याबाबत खाली माहिती दिली आहे.
पैसे जमा झाले की नाही ते कसे तपासणार?
– सर्वप्रथम पीएम-किसान पोर्टल ‘https://pmkisan.gov.in’ वर जा.
– या ठिकाणी ‘फार्मर कॉर्नर’ वर जाऊन ‘बेनिफिशिअरी स्टेटस’ वर क्लिक करा.
– या ठिकाणी आधार क्रमांक, खाते क्रमांक वा मोबाईल क्रमांक टाका.
– आता खालील कॅप्चा कोड (PM Kisan ) टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
– त्यानंतर ‘गेट स्टेटस’ क्लिक करा.
– ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीएम-किसान खात्यात रक्कम जमा झाली की नाही हे कळेल.
लाभार्थी यादीतील नाव कसे तपासायचे?
– सर्वप्रथम तुम्हाला https://pmkisan.gov.in/ या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.
– लॉग इन केल्यानंतर सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.
– त्यानंतर वरच्या उजव्या बाजूला (PM Kisan ) असलेल्या प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना लाभार्थी यादी 2024 वर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला एका नवीन वेबपेजवर रीडायरेक्ट केले जाईल. त्यामध्ये तुम्हाला लाभार्थी यादीतील तुमचं नाव तपासता येईल.
0 Comments