राष्ट्रवादी पुन्हा फुटणार ? शरद पवारांच्या नव्या डावाने सगळेच बुचकुळ्यात



महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची भीती आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीने (शरद पवार) अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काही लोक संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

त्यावर शरद पवार यांनी मौन सोडले. ते म्हणाले, "जे नेते पक्ष आणि जनतेसाठी मदत करतील, पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल आणि अशा ठिकाणी परतणाऱ्यांचे स्वागत करायला हरकत नाही. मात्र, ज्या लोकांनी पक्षात राहून पक्षाचे फायदे घेतले, फायदा घेतल्यानंतरही पक्षाचे नुकसान करण्यासाठी पावले उचलली, त्या लोकांबाबत आता सध्या पक्षात जे नेते आहेत, त्यांचे मत घ्यावे लागेल.'

शरद पवारांच्या या प्रतिक्रियेनंतर महाराष्ट्रात अजित पवार गटात खळबळ माजली आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी खुलासा करताना सांगितले की, "शरद पवार साहेबांचे हे विधान जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी करण्यात आले आहे, त्यात काहीही तथ्य नाही. आमचे आमदार आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. कोणी कुठेही जाण्याची शक्यता नाही.

Post a Comment

0 Comments