पाच हजाराची लाच घेणारा मंडलाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवेढा पोलीस ठाण्यात सुरू आहे. चंद्रकांत इंगोले, मंडल अधिकारी मारापुर तालुका मंगळवेढा असे अँटी करप्शनने ताब्यात घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
तक्रारदार यांनी जमीन बक्षीस पत्र करून सातबारा उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यासाठी तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता तेव्हा मंडल अधिकारी इंगोले यांनी तक्रारदाराकडे सात हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले. पाच हजार रुपये देताना संत दामाजी साखर कारखाना रोडवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकाने इंगोले यांना रंगेहात पकडले.
0 Comments