आरएसएसची अजित पवारांवर टीका; शरद पवार गटाचे दोन नेते भाजपावर भडकले


राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील  पक्षांच्या सहकार्याने भाजपाच्या नेतृत्वात सत्ता स्थापन करण्यात आली, मात्र भाजपाला लोकसभा निवडणुकीत 240 जागा मिळाल्यामुळे त्यांना स्वबळावर बहुमताचा आकाडा पार करता आला नाही. याचपार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ‘ऑर्गनायझर’ मधील लेखातून भाजपावर निशाणा साधण्यात आला.

 नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेपुढे सामान्य भाजपा कार्यकर्त्यांचा, पाठीराख्यांचा आवाज स्थानिक नेतृत्वाने ऐकला नाही. तसेच अजित पवारांना सोबत घेऊन भाजपाने चूक केली, असेही लेखातून म्हटले होते. याचपार्श्वभूमीवर विरोधक भाजपासह अजित पवारांवर निशाणा साधताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले.

आरएसएसच्या मुखपत्रातून करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राज्यातील पराभवाला अजित पवार जबाबदार असतील तर, भाजपाच्या उत्तर प्रदेशमध्ये कमी जागा आल्या आहेत. त्याठिकाणी भाजपाने कोणी अजित पवार यांनी शोधला आहे का? असा खोचक प्रश्न विचारत अजित पवार गटाने आधी स्वतःकडे पाहावं, असे म्हटले आहे. ते म्हणाले की, गजा मारणेबरोबर कोण चहा प्यायला गेलं होतं ते पाहा. जिनके शिशेके घर होतें हैं, वो दुसरों के घरोपर पत्थर नहीं मारा करते, असा हिंदी चित्रपटातील डायलॉग बोलत त्यांनी आरोप केला की, अजित पवार यांना बाजूला करण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. यासाठी अजित पवारांवर चारी बाजूने हल्ले केले जात आहेत, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Post a Comment

0 Comments