बीडची जागा कोण जिंकणार?; एक्झिट पोल्सचा आश्चर्यकारक अंदाज


बीड लोकसभा मतदारसंघात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी संधी देण्यात आली. इतक्या वर्षे राजकीय वनवास भोगल्याचं त्यांनी बऱ्याचदा बोलून दाखवलं होतं. त्यामुळे या लोकसभा  निवडणुकीत पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्याशी होत आहे. येत्या 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागणार आहे. त्यापूर्वीच विविध माध्यम संस्थांच्या एक्झिट पोल्सची आकडेवारी जाहीर होत आहे.


पंकजा मुंडे vs बजरंग सोनवणे
काही मीडिया एक्झिट पोल्सनुसार, बीडमध्ये कोण वरचढ ठरणार, याबाबत मोठं भाकीत समोर आलंय. बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. तर, शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे सर्वात पिछाडीवर असल्याचं कळतंय.

दुसरीकडे काही मीडियाच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीला 24 तर मविआला 23 जागांचा अंदाज दिला आहे. भाजप 17, तर शिंदे गटाला 6 जागांचा अंदाज. अजित पवार गटाला फक्त एक जागेवर विजय शक्य असल्याचं म्हटलं गेलंय. दुसरीकडे, मविआमध्ये काँग्रेसला 8, ठाकरे गटाला 9 जागांचा अंदाज आणि शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसणार?
2019 ला 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी 17 जागांवरच विजय मिळण्याची शक्यता. शिंदे गटाचा आकडाही 13 वरुन 6 पर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून शिवसेनेतील शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गट भाजपसोबत गेला. त्यामुळे भाजपच्या नेतृत्त्वाखालील महायुतीला मोठं यश मिळेल, असा अंदाज होता. मात्र, एक्झिट पोलची आकडेवारी पाहता लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments