नाशिक |
नाशिकच्या राजकारणात जरांगे पाटलांची एंट्री?; मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा दिला आहे. राज्य सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण मंजूर केलं, मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे.
जरांगे पाटील आपल्या वक्तव्यामुळे कायमच चर्चेत राहत असतात. आता ते लोकसभा निवडणुकीमुळे चर्चेत आले आहेत. सहा जूनपर्यंत आरक्षण मिळालं तर ठिक नाहीतर विधानसभेच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करणार, अशी घोषणा त्यांनी केली. यासबतच . लोकसभेत पाडणारे बना, आपल्या लेकराबाळाचा चेहरा समोर ठेवून मतदान करा. असं आवाहन देखील जरांगे यांनी मराठा समाजाला दिलं आहे.
वंचितच्या उमेदवाराने घेतली जरांगे पाटलांची भेट
आता जरांगे पाटील नाशकात एंट्री करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातंय. नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीने करण गायकर यांना उमेदवारी दिली आहे. गायकर यांनी नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.
करण गायकर यांनी मनोज जरांगे पाटील यांनी पाठिंबा द्यावा, अशी मागणी केल्याचं बोललं जातंय.करण गायकर हे मराठा क्रांती मोर्चाचे राज्याचे समन्वयक देखील आहेत. त्यांनी पाठिंबा मिळावा यासाठी पदाधिकाऱ्यांसह मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. आता जरांगे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
जरांगे पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांना सहकार्य करायला हवं, अशी भूमिका बऱ्याचदा घेतली आहे. त्यामुळे ज जरांगे पाटील हे आता वंचितचे उमेदवार करण गायकर यांना पाठिंबा देणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, नाशिकमध्ये महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा झाली आहे. तर, महाविकास आघाडीकडून येथे राजाभाऊ वाजे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे करण गायकर यांना गोडसे आणि वाजे यांचं आव्हान असेल.
0 Comments