सोलापूर |
भारतीय जनता पक्षाचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचार सभेत धार्मिक भावना दुखावणारे विधान केल्याप्रकरणी भाजपचे युवा नेते, माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्यावर सोलापूरमधील जेल रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आमदार राम सातपुते यांच्यासाठी सोलापुरातील कर्णिक नगरच्या लिंगराज वल्याळ मैदानावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत देवेंद्र कोठे यांचे भाषण झाले होते. त्या भाषणात त्यांनी मुस्लिम धर्मियांविषयी भावना दुखावणारे विधान केले होते.
गोरक्षकांचे रक्षण करण्यासाठी आगामी काळात कडक कायदा निर्माण करण्यात यावा, अशी मागणी देवेंद्र कोठे यांनी केलली होती. त्या भाषणात बोलताना त्यांनी मुस्लिम धर्मियांविषयी भावना दुखावणारे विधान केले होते. तसेच, राहुल गांधी यांच्या महिलांना एक एक लाख रुपये देण्याच्या विधानाचा मुस्लिम धर्मियांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न कोठे यांनी केला होता.
माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या विरोधात मुस्ताक महबूब शेख यांनी जेल रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. एक मे रोजी घडलेल्या गुन्ह्या प्रकरणी देवेंद्र कोठे यांच्यावर 17 मे रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
0 Comments