मुंबई |
नोकरी संदर्भात एक सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. भारतीय पोस्ट विभागात ग्रामीण पोस्टल सर्विस (GDS) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत शाखा पोस्ट मास्टर्स (बीपीएम), सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर्स (एबीपीएम), डाक सेवक आणि शाखा पोस्ट ऑफिस (बीपीओ) या पदाच्या 40,000 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना लवकरच जारी करण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात ही अधिसूचना जारी केली जाऊ शकते. या पदांच्या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने स्वीकारली जाणार आहे. जाणून घेवूया सविस्तर….
आवश्यक शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मॅट्रिक किंवा 10 वीमध्ये इंग्रजी विषयाचा अभ्यास पूर्ण केला असावा. तसेच उमेदवाराने माध्यमिक शालेय स्तरावर त्याच्या/तिच्या मातृभाषेचा अभ्यास केलेला असावा.
अशी असेल निवड प्रक्रिया
शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना त्यांचे फॉर्म सत्यापित करणे आवश्यक आहे. गुणवत्ता यादी उमेदवारांच्या ऑनलाइन नोंदणीवर आधारित असेल आणि अंतिम निवड 10वीच्या परीक्षेतील त्यांच्या कामगिरीवर आधारित असेल.
वय मर्यादा (India Post Rrecruitment 2024)
भारतीय पोस्टमध्ये GDS साठी 40,000 हून अधिक नोकऱ्या रिक्त आहेत आणि ही पदे लवकरच भरली जातील. GDS पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी वय मर्यादा 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान निश्चित करण्यात आली आहे.
अर्ज फी – (India Post Rrecruitment 2024)
सामान्य – रु. 150
इतर मागासवर्गीय – रु. 150
आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग – रु. 150
महिला उमेदवार – रु. 150
अनुसूचित जाती – मोफत
अनुसूचित जमाती – मोफत
अक्षम – विनामूल्य
0 Comments