पहिला Video Call कोणी, कुणाला आणि कधी केला होता?



अनेकांना वाटतं की बाजारात स्मार्टफोन आल्यानंतर व्हिडीओ कॉलिंगची सुरुवात झाली. तर आम्ही तुम्हाला सांगतो पहिला व्हिडीओ कॉल हा खूप वर्षांपूर्वी 30 जून 1970 मध्ये करण्यात आला होता. हा पहिला व्हिडीओ कॉल  पिट्सबर्गचे महापौर पीटर फ्लेर्टी आणि अल्कोआचे अध्यक्ष आणि सीईओ जॉन हार्पर यांच्यामध्ये झाला होता. या व्हिडीओ कॉलसाठी Picturephone Mod II नावाचे छोटे उपकरणाचा वापर करण्यात आला होता. 

व्हिडीओ कॉलला मराठी आणि हिंदीत काय नाव?

आजकाल कुठल्याही भाषेतील व्यक्ती असो तो सरसर्कट व्हिडीओ कॉल हा शब्द वापरतो.  हिंदी आणि मराठीत व्हिडीओ कॉलला चलचित्र टेलिफोन असं म्हटलं जातं. तर चीन, कोरिया आणि जपानमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये व्हिडीओ कॉलला वेगवेगळं नाव आहे. चिनी भाषेत व्हिडीओ कॉलला  Shipín diànhuà  असं म्हटलं जातं. 

भारतात पहिला मोबाईल कॉल कधी करण्यात आला?

तर भारतात पहिला मोबाईल कॉल हा 31 जुलै 1995 मध्ये करण्यात आला होता. पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योति बसू यांनी कोलकातावरुन दिल्ली संचार भवनात केला होता.

त्यांनी हा मोबाईल कॉल केंद्रीय संचार मंत्री सुखराम यांना केला होता. यासाठी नोकिया 2110 हा हँडसेटचा वापर केला होता.

Post a Comment

0 Comments