भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे चा मृत्यू झाला आहे. आदमपूर परिसरातील दिव्या धाम अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 104 मध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत अभिनेत्रीचा मृतदेह आढळून आला.
या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली होती. स्थानिक लोकांच्या मदतीने कुटुंबीयांनी मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच जोगसर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला चौकशीसाठी पाचारण केले. पथकाने येऊन सर्व पुरावे गोळा केले. पोलिसांनी तिच्या मोबाईलची तपासणी केली असता सकाळी 10:15 वाजता अमृताने तिच्या व्हॉट्सॲपवर स्टेटस टाकल्याचे आढळून आले. त्यावर तिने लिहिले होते की, 'क्यों दो नाव पर सवार थी उसकी जिंदगी, हमने नाव डूबाकर उसका सफर आसान कर दिया।'
0 Comments