उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोपल-ओमराजे प्रथमच एकत्र


बार्शी |

लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं असून उस्मानाबाद मतदारसंघातून उमेदवारी जाहिर झाल्यानंतर प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात माजी मंत्री दिलीप सोपल व खासदार ओमराजे निंबाळकर एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. शहरातील महेदवी मशीद येथे महेदवी समाजाचा रोजा इफ्तार कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक महेदीमिया लांडगे यांनी केले होते. यावेळी सामुहिकरित्या रोजा सोडल्यांनतर नमाज पठण झाले. यावेळी, माजी नगराध्यक्ष व राशपचे नेते विश्वास बारबोले हेही आवर्जून उपस्थित होते. 


ओमराजे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी मंत्री व खासदार प्रथमच एकत्र दिसले. कारण, शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकडे सोपल यांनी पाठ फिरवल्याने लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका काय असणार, यावर बार्शीत चर्चा होत आहे. दरम्यान, याप्रसंगी, सोपल यांनी मनोगतामध्ये विचार मांडताना, मुस्लीम समाजाच्या सार्वजनिक समस्या सोडविण्यासाठी आपण कायम वचनबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर व माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनीही या उपक्रमाबद्दल संयोजकांचे कौतुक केले. तर, प्रास्ताविकामध्ये लांडगे म्हणाले की, सोपल यांचे मुस्लिम समाजाशी अतुट नाते असून बार्शी तालुक्यातील मुस्लीम समाजाच्या तीन पिढ्यातील कुटूंबांची सोपल यांच्याबरोबर जवळीक आहे. त्यामुळे सोपल यांच्या रमजान ईद व सर्वच धार्मिक कार्यक्रमातील उपस्थितीमुळे समाज बांधवांचा आनंद वाढतो, असे लांडगे यांनी म्हटले.


यावेळी अॅड. प्रशांत शेटे, मनीष चौहान,माजी नगरसेवक वाहीद शेख, दिनेश नाळे, पाशाभाई शेख,कोहिनूर सय्यद,असिफ जमादार,वैभव पाटील,निलेश मुद्दे, अतिश बिसेन,बाबा कुरेशी,बडूभाई लांडगे आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समाजातर्फे शहेजादे मौलवीसाहब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments