धाराशिवमधील कळंब तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील शेतकरी आण्णा काळे (वय ४८) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. वडिलोपार्जित शेती असल्याने त्यातून उत्पन्न घेऊन घराचा उदरनिर्वाह आण्णा काळे करत होते. परंतु पुरेसा पैसे नसल्याने शेतीसाठी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. परंतु हे कर्ज फेड होऊ शकत नसल्याने काळे हे विवंचनेत होते. याच विवनचनेतून अण्णा काळे यांनी पिंपळगाव शिवारातील शेतात पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे.
अण्णा काळे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिट्ठी लिहून ठेवली आहे. यात खाजगी सावकाराचा ञास व तेरणा कारखान्याने ऍडव्हॉस रक्कम न दिल्याचा चिठ्ठीतत उल्लेख केला आहे. शिवाय जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पालकमंत्री तानाजी सावंत, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, राष्ट्रवादीचे श्रीधर भवर यांनी कुटुंबाला आर्थीक मदत करण्याबाबत चिठ्ठी लिहून आवाहन केले आहे.
0 Comments