पंढरपूर-मंगळवेढा रोडवर अनवली येथे दुचाकीवरून २ किलो ८८५ ग्रॅम गांजा घेऊन जाणा-या दोघांना पाेलिसांनी अटक केली आहे. पंढरपूर तालुका पोलिसांनी १ लाख १७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, अनवली (ता. पंढरपूर) शिवारातील हॉटेल शिवनेरीजवळ पंढरपूर ते मंगळवेढा जाणारे रोडवर २२ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी पावणे चारच्या सुमारास पाेलीस निरीक्षक तय्यब मुजावर, सहायक पोलीस निरीक्षक शंकर ओलेकर, बाळासाहेब माने यांच्याबरोबर पोहेकॉ सचिन आटपाडकर, सपोफौ. दत्तात्रय तोंडले, पोना. सुहास देशमुख, सज्जन भोसले, अधिकारी व अंमलदार हे नाकाबंदी करत होते.
यावेळी गणेश रवींद्र होटकर (वय ३९, रा.बेगमपूर, घोडेश्वर, ता.मोहोळ) व बाळासाहेब विलास शिंदे (वय ४०, रा. शिक्षक कॉलनी, टाकळी रोड, पंढरपूर) हे दोघे मोटरसायकल (एम. एच. १४ / एफ. क्यु. ३८७४) वरून सिद्धेवाडी ते गोपालपूरकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या ताब्यातील गांजा आणि मोटरसायकल जप्त केली. त्या दोघांविरुद्ध पो. कॉ. सचिन आटपाडकर यांनी फिर्याद दिली आहे.
0 Comments