मुंबई |
मराठा आरक्षणावरुन राज्यात आंदोलन पेटलं आहे. एकीकडे राज्य सरकारने कुणबी पुरावे असलेल्या लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठीचा जीआर काढलाय. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणावर ठाम आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी अधिवेशन बोलवून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र ओबीसीमध्ये समावेश करावा अशी मागणी केली आहे. या मागण्या मान्य झाल्या नाहीतर आजपासून पाणी पिणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही जरांगे पाटील यांनी लक्ष्य केलं आहे.
"आंदोलन खूप मोठं झालंय. मराठा समाजाल आरक्षण दिल्याशिवाय इथून उठणार नाही. आमच्याकडून उद्रेक होणार नाही. अशी बैठक बोलवण्याची दुसरी वेळ आहे. आरक्षण का देत नाही किंवा किती दिवस लागतील हे स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. सगळ्यांना विनंती आहे की तातडीने विशेष अधिवेशन बोलवायला लावला. त्यामध्ये मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र ओबीसीमध्ये समावेश करावा. मराठा समाजाचे तरुण शांततेत आहेत. सरकारमधीलच लोक आंदोलन करत असतील. अधिवेशनाचा निर्णय घेतला नाही तर मी संध्याकाळपासून पाणी सोडणार," असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
0 Comments