वैराग |
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे -पाटील यांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणास पाठिंबा व्यक्त करण्यासाठी बार्शी तालुक्यातील सकल मराठा समाजा तर्फे धामणगावमधील बोधले महाराजांच्या मंदिरात साखळी उपोषण करण्यात येणार आहे. बार्शी तालुक्यातील धाकली पंढरी म्हणून ओळखले जाणारे धामणगाव हे विविध आघाड्यावर आक्रमक असते.
सकल मराठा समाजातर्फे धामणगाव मध्ये पदयात्रा काढण्यात आली. मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू असून यात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होत आहेत. या साखळी उपोषणामध्ये महिलांचे उपस्थिती ही लक्षणीय आहे. धामणगावमध्ये साखळी उपोषणे सुरू असून नेत्यांना कडक गावबंदी करण्यात आली आहे.
या साखळी उपोषणामध्ये गावातील भजनी मंडळीचे दररोज संध्याकाळी ६ ते १० पर्यत हरिपाठ व भजन केले जाते. मराठा समाजाच्या आरक्षणावर निर्णय न झाल्यास बुधवार दि १ नोव्हेंबर पासुन वसंत गोपीनाथ कोरके हे आमरण उपोषणाला बसणार आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गावोगावी साखळी उपोषणे सुरू आहेत, पदाधिकारीही राजनाम्याचे अस्त्र उगारत आहेत. धामणगांव येथील उपोषण स्थळाला वैराग पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक विनिय बहीर, धामणगांव आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य, सेवक सेविका यांनीही भेटी दिल्या आहेत.
0 Comments