मुंबई |
अभिनेत्री सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला मारहाण करण्यात आल्याची घटना मुंबईतल्या मालवणी भागात घडली आहे. सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरने मालवणी भागात या ड्रायव्हरने दोनदा हॉर्न वाजवला. त्याचा राग मनात धरुन चार मुलांनी बांबू आणि पट्ट्याने मारहाण केली. ही मुलं झिगझॅग पद्धतीने बाईक चालवत होती. त्यामुळे सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरने हॉर्न वाजवला. याचा राग मनात धरुन त्याला मारहाण करण्यात आली. सद्दाम मंडल असं सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरचं नाव आहे. मागच्या सहा वर्षांपासून कार चालक म्हणून तो सई ताम्हणकरकडे काम करतो आहे.
या प्रकरणी सद्दाम म्हणाला की मी गाडी चालवत होतो. त्यावेळी काही जण झिगझॅग पद्धतीने बाईक चालवत होते. त्यांचा अपघातही होऊ शकत होता इतक्या वेगात ते होते. मी हॉर्न वाजवला आणि गाडी नीट चालवा असंही सुचवलं. त्यानंतर या मुलांनी त्यांच्या बाईक थांबवला आणि मला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मुलांनी त्यांच्या मित्रांनाही त्या ठिकाणी बोलवून घेतलं आणि मला मारहाण केली. त्यानंतर ते तिथून पळून गेले. मालवणीतल्या काही स्थानिकांनी मला शताब्दी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर मी या प्रकरणा पोलिसात तक्रार दिली. आम्ही या प्रकरणी अज्ञातांविरोधात FIR दाखल केली असून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments