देणेकरी घरी येऊ लागल्यामुळे त्यांना कंटाळून आम्ही घर सोडून जात असल्याबाबत घरामध्ये ठेवलेल्या डायरीमध्ये लिहून ठेवून पती, पत्नी व त्यांच्या तीन मुलांसह असे एकूण पाच जणांचे कुटुंब पुळूजवाडी (ता.पंढरपूर) येथून निघून गेल्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात पाच जण बेपत्ता झाल्याची खबर दि.१९ ऑगस्ट रोजी देण्यात आली आहे.
सुदाम रामचंद्र यादव (रा. पुळूजवाडी, ता. पंढरपूर), तात्यासाहेब यादव यांचे वडील सुदाम यादव यांनी मुलगा तात्यासाहेब यादव (वय ३३), कोमल तात्यासाहेब यादव (वय २९), मुलगी राजनंदिनी (वय ५), मुलगा यशराज (वय ४), तिसरा मुलगा राजकुमार (वय २) असे एकूण पाच जण
घरातून निघून मोहोळ येथील एसटी स्टँड येथून दि. १४ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजेपासून घरात कोणालाही काहीही नाही सांगता बेपत्ता असल्याबाबतची खबर मोहोळ पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी तीन दिवस नातेवाइकांकडे चौकशी केली. मात्र, ते घरी नाही आल्याने बेपत्ता झाले.
0 Comments