"धाराशिव | वाशी येथे १५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने एकाला घेतले ताब्यात...!"


धाराशिव |

जमिनीची अकृषिक अतितातडी मोजणी करण्यासाठी १५ हजाराची लाच स्वीकारणारा वाशी येथील परिरक्षण भुमापक नामे सुनील श्रीराम रामदासी, वय ५५ वर्षे, परिरक्षण भुमापक ( निमतानदार), भूमी अभिलेख कार्यालय वाशी, ज़िल्हा उस्मानाबाद ( वर्ग - ३ ) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

याबाबत हकीकत अशी की, तक्रारदार यांनी त्यांच्या नावाने असलेल्या जमिनीची अकृषिक अतितातडी मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय, वाशी येथे अर्ज दाखल करून स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये चलन भरलेले होते.

 तक्रारदार यांच्या जमिनीच्या मोजणीसाठी नोटीस काढून त्यांच्या जमिनीची अतितातडी मोजणी करून देण्यासाठी यातील आलोसे सुनील श्रीराम रामदासी, वय ५५ वर्षे, परिरक्षण भुमापाक ( निमतानदार), भूमी अभिलेख कार्यालय वाशी यांनी पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे २०,०००/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती १५,०००/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारल्याने आरोपी रामदासी यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन वाशी, जिल्हा उस्मानाबाद येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

Post a Comment

0 Comments