बार्शी |
गेल्या २८ वर्षांपासून येथील औद्योगिक वसाहतीचा प्रश्न रखडलेला आहे.त्यामुळे अनेक उद्योजकांनी शहराच्या वाढीव भागात आपले औद्योगही उभारले.मात्र, 'एमआयडीसी' आवश्यक असलेल्या जागा, वीज आणि रस्त्यांचा प्रश्न निकाली लागला असून मंगळवारी जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकाऱ्यांसह आमदार राजेंद्र राऊत यांनी औद्योगिक वसाहतीच्या जागेची पाहणी केली. एवढेच नाहीतर स्थानिक पातळीवर काय अडचणी आहेत,याचाही आढावा घेतला.
विद्युत पुरवठा आणि पाण्याची सोयही ही नगरपालिकेच्या माध्यमातून केली जाणार असल्याने आगामी तीन ते चार महिन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार असल्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.बार्शी शहराला लागून असलेल्या बीआयटी जवळील १९८ एकरामध्ये औद्योगिक वसाहत उभारली जाणार आहे.शिवाय शेतकऱ्यांच्या परवानगीने अजून जमिन ही संपादन केली जाणार आहे. मात्र,दरम्यानच्या काळात या भागात केवळ रस्ते आणि काही प्रमाणात विद्युत खांब उभारण्यात आले होते.त्यामुळे येथील कामही रखडले होते. मात्र,उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत आता सर्व प्रश्न निकाली काढण्यात आल्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.त्यामुळे मंगळवारी जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी,महावितरणचे तसेच नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करुन विजेचा आणि पाण्याचा प्रश्न निकाली लावला जाणार असल्याचे सांगितले आहे.
यावेळी नितीन वानखेडे(मुख्य अभियंता,पुणे), राजेंद्र गावडे(अधिक्षक अभियंता,पुणे), सुधाकर गांधिले(कार्यकारी अभियंता), वसुंधरा जाधव(प्रादेशिक अधिकारी, सांगली), अशोक मगर(उप अभियंता), एम.आय.पठाण (भुमापक प्रमुख), बार्शीचे तहसीलदार सुनील शेरखाने,नायब तहसीलदार संजीवन मुंढे तसेच इतर प्रमुख अधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
0 Comments