"पुण्यात भाजपकडून पैशाचा पाऊस...!" काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दावा


पुणे |

पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी खळबळजनक दावे केले आहेत. निवडणुकीत पोलिसांच्या मदतीने पैशांच वाटप केलं जात आहे, असा आरोप रविंद्र धांगेकर यांच्याकडून करण्यात आला आहे.

कसबा मतदार संघातील रविवार पेठ, गंज पेठ या सारख्या आदी भागात भाजपने पैशांचे वाटप सुरू केले असून या संपूर्ण प्रकारात पोलिस देखील सहभागी असल्याचे धंगेकर यांचे म्हणणं आहे. पुण्यात पैशांचा पाऊस पडतोय. भाजपतर्फे लोकांना पैसे वाटले जात आहेत. पोलीस उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत. पोलिसांनी माझ्या कार्यकर्त्यांना बोलावून दमदाटी केली. काल मी एका पोलीस अधिकाऱ्याला भेटलो. तो हतबल होता. पण आज जनतेसमोर मला हे बोलावच लागेल, असं रवींद्र धंगेकर म्हणालेत.

Post a Comment

0 Comments