बार्शी |
आज दि.९ जानेवारी २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळजापूर व नागोबावस्ती केंद्र - गौडगाव ता. बार्शी जि.सोलापुर शाळेच्या संयुक्त विद्यमाने आळजापूर येथे बाल आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. उत्तेश दुधभाते,शरद उंबरे व पोलीस पाटील उत्तरेश्वर उंबरे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी महादेव देव्हारे, मनोज देशमुख, अतुल उंबरे, अंगद उंबरे, अकलाक चौगुले, महिबूब चौगुले, ताजुद्दीन मुजावर, दगडू पाटमास तसेच मुख्याध्यापक श्री. शौकत बागवान सर, प्रमोद घुगे सर व ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व्हावे, परिसरातील पालेभाज्या-फळभाज्यांची ओळख व्हावी यासाठी बाल आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. या बाल आनंद बाजारात शाळेतील सर्व विद्यार्थी विविध प्रकारचे खाद्य पदार्थ,शैक्षणिक साहित्य, पालेभाज्या, फळे घेऊन सहभागी झाले होते. या बाल आनंद बाजारात एकुण ३५ स्टाॅल होते आणि यामध्ये एकूण ७८०० रुपये उलाढाल झाली.
खरेदी करण्यासाठी व गावातील सर्व पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. बाल आनंद बाजार यशस्वी करण्यासाठी शौकत बागवान, प्रमोद घुगे व सूर्यकांत सरक या शिक्षकांनी परिश्रम घेतले.
0 Comments