सोलापूर |
सोलापूर शहरात जड वाहनाचा आणखीन एक बळी गेला आहे.असद अल्ताफ बागवान(वय 3 वर्ष ,रा,कर्जाळ,त अक्कलकोट ) असे मृत बालकाचे नाव आहे.आजी आजोबा सोबत सोलापूर शहरात येत असलेल्या नातवाला ट्रकने चिरडल्याने रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.
ट्रक क्रमांक एम एच 13सीयु 0194 असे असून ट्रक चालकाला जेलरोड पोलिसांनी ताब्यात घेतले.आजी मुमताज सरदार बागवान(वय 45,रा कर्जाळ,ता अक्कलकोट ) या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत.शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल के आहे ,तर तीन वर्षीय बालक अल्ताफ बागवान याचे मृतदेह शवविच्छेदनसाठी दाखल करण्यात आले आहे.
0 Comments