केंद्राने राज्यपालाचे हकलपट्टी करावी ; महामोर्चा वेळी शरद पवार यांचे प्रतिपादन


मुंबई |

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने केला जाणारा महापुरुषांचा अपमान या मुद्यांवरुन शिंदे - फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीतर्फे महामोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ या मोर्चाचा शेवट झाला यावेळी महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते यावेळी मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी भाषणादरम्यान राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार  यांनी राज्य सरकारवर टीका केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अखंड भारतभर आदर व्यक्त केला जातो याशिवाय हे सरकार आल्यानंतर वारंवार महापुरुषाचा अपमान करत आहे या मोर्चा शरद पवारांनी भाजप सरकारवर टीका केली. राज्यकर्त्यांनी या इशाऱ्यातून बोध घेतला नाहीतर लोकशाहीच्या माध्यमातून धडा शिकवायल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा राज्यपाल कधी पाहिला नाही. राज्यपालांना शरम वाटली पाहिजे. सगळ्या देशभरात महात्मा फुले यांचे नाव आदराने घेतलं जातं. अशा व्यक्तीची टिंगलटवाळी राज्यपालांकडून केली जात असेल तर त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांची हकालपट्टी करावी," असेही शरद पवार म्हणाले.

Post a Comment

0 Comments