मालट्रकने रिक्षात बसलेल्या अख्ख्या कुटुंबाला चिरडले; एक युवती ठार तर सहाजण गंभीर जखमी


सोलापूर |

सोलापूर शहरात पुन्हा रक मोठा अपघात झाला आहे. शुक्रवार असल्याने अख्ख कुटुंब शहरातील शाहजहूर येथील दर्ग्याला दर्शनासाठी रिक्षामद्धे जात होते. पण सुसाट चाललेल्या मालट्रकने रिक्षाला शहरातील शेळगी जवळ असलेल्या मार्गावर चिरडले.यामध्ये एका युवती जाग्यावर ठार झाली आहे. 

मिसबा शुकुर मुलानी (वय 14 वर्ष,रा आदर्श नगर,शेळगी परिसर, सोलापूर शहर) असे मृत्य झालेल्या युवतीचे नाव आहे.तर त्याच कुटुंबातील इतर आठ सदस्य देखील गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुकसाना कोरबू (वय 45,), जन्नत कोरबु ( 20 वर्ष), हसीना शब्बीर कोरबु (वय 25 वर्ष), अलिम शुकूर कोटबू (वय 3 वर्ष), नौशाद सुरज कोरबू (वय 25 वर्ष), मुजिर पठाण (वय 24 वर्ष), मोहम्मद साद (वय वय 7 वर्ष) असे जखमींचे नाव आहेत. जखमींवर सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालय उपचार सुरु आहे.

Post a Comment

0 Comments