गेल्या काही दिवसापासून सानिया व शोएब मलिक यांच्यामध्ये लवकरच घटस्फोट होणार यासारख्या बातम्या प्रकाशित होत आहेत, नेमकं काय होतंय ते तर येणारा काळच ठरवेल. गेल्या काही दिवसांपासून भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्यामध्ये काही तरी बिनसलं असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. २०१० साली या दोघांनी लग्न केले असून त्यांना इझान नावाचा एक मुलगा आहे. मात्र असे मानले जात आहे की या जोडप्यामधील अंतर वाढत असून ते दोघे लवकरच विभक्त होणार आहेत.
सानिया आणि शोएबच्या लग्नाला आता १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. एप्रिल २०१० मध्ये अतिशय वादग्रस्त प्रसंगामध्ये त्यांचं लग्न झालं होतं. मात्र, इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच या दोघांमध्ये काहीही ठीक नसल्याच्या अफवांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी शोएब आणि सानिया यांनी एकत्रितपणे त्यांच्या मुलाचा वाढदिवस साजरा केला. शोएबने यासंबंधीचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. मात्र सानियाने यासंबंधी कोणतीही पोस्ट केली नाही. मात्र सानियाने नुकत्याच केलेल्या पोस्टमुळे लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
0 Comments