वैराग |
भावासोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या शहाबाज सलीम पठाण (वय १८) या तरुणाचा तलावात बुडून सोमवारी दुदैवी मृत्यू झाला आहे. अलीम रहिमखान पठाण (राहणार उस्मानाबाद) यांनी घटनेची माहिती वैराग पोलीसात दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
उस्मानाबाद येथील शहाबाज हा उदरनिर्वाहासाठी आपल्या आई, वडील व भावासोबत वैराग येथील सिध्दार्थ नगरमध्ये राहातं होता.
सोमवारी दुपारी शहाबाज हा भाऊ शहानवाज व शाहिद यांच्यासोबत मोहोळ रस्त्यावरील भुमकर यांच्या शेताजवळ तलावावर कपडे धुण्यासाठी गेला होता भाऊ कपडे धुवत होते. त्यावेळी शहाबाज तलावा मध्ये उतरला ,त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्याला व त्याच्या भावाला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला.शहाबाजला वाचविण्यासाठी भावाने प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही.
वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने वैराग शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments