कामाचे बिल काढण्यासाठी ग्रामसेवकाने बक्षीस म्हणून मागितली एक लाखाची लाच ; ग्रामसेवक अँटी करप्शनच्या जाळ्यात


सोलापूर |

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील बोराळे ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असणाऱ्या ग्रामसेवकाला अँटी करप्शनने बेड्या ठोकल्या आहेत. शासकीय योजनेतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामाचे बिल खात्यात जमा केल्याचे बक्षीस म्हणून एक लाखाची लाच मागणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून अटक केली. गोपीचंद दादा गवळी वय-५६ वर्षे पद-ग्रामविकास अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, यातील तक्रारदार याचे मित्र हे कॉन्ट्रक्टर असून त्यांचे मित्रानी मौजे बोराळे, ता. मंगळवेढा येथे शासकीय योजनेतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामाचे व जिल्हा परिषद सेस निधी अंतर्गत केलेल्या कामाच्या बिलासंदर्भात तक्रारदार पाठपुरावा करीत होते. सदर कामाच्या बीलाची रक्कम खात्यात जमा केली बाबत ग्रामसेवक  गोपीचंद गवळी यांनी तक्रारदार यांच्याकडे बक्षिस / मोबदला म्हणून १,००,००० रु. लाचेची मागणी करुन पहिला हप्ता ५०,००० रु. मागणी केल्याचे पडताळणीत स्पष्ट झाल्याने आलोसे यास ताब्यात घेवून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

ही कारवाई चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर,  पोलीस हवालदार प्रमोद पकाले, पोकॉ उमेश पवार, पोकों रवप्निल सण्णके, चापोकॉ शाम सुरवसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments