सोलापूर |
भीमा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूकीचा निकाल दोन फेरीत पूर्ण होणार आहे.याबाबत अधिकृत माहिती जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी सकाळीच दिली आहे. भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निकालाच्या पहिल्या फेरीत २८ केंद्रावरील मतमोजणी निकाल लवकरच हाती येणार आहे.भाजप खासदार धनंजय महाडिक यांचा भीमा परिवार पॅनल पहिल्या फेरीत आघाडीवर असल्याची प्राथमिक समोर आली आहे.राजन पाटील व प्रशांत परिचारक यांचा भीमा बचाव पॅनल पहिल्या फेरीत मागे फेकला गेला आहे.महाडिक समर्थकांनी पंढरपूर,मोहोळ आदी भागात जल्लोषाची तयारी केली आहे.पहिल्या फेरीत 28 केंद्रावर महाडिक गटाने मुसंडी मारली आहे.
0 Comments