भाऊराव कऱ्हाडे यांच्या 'टीडीएम' चित्रपटातील बकुळा गाणं लवकरचं…



भाऊराव कऱ्हाडे यांच्या बहुचर्चित आशा ‘टीडीएम’ चित्रपटातील पहिले लिरिकल गाणे ‘बकुळा’ हे लवकरच रिलीज होत आहे. त्याचे पोस्टर काही दिवसापूर्वी प्रकाशित झाले होते, वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये भाऊराव सिने रसिकांसाठी काहीतरी नाविन्यपूर्ण देणार याची उत्सुकता लागली आहे.

ख्वाडा आपल्या पहिल्या चित्रपटातून सिनेरसिकांचे लक्ष वेधून घेत राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या भाऊराव कऱ्हाडे यांचा बबन हा चित्रपटही यशस्वी झाला. आत्ता भाऊरावांनी कॉमेडी चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केली आहे या चित्रपटाचे नाव आहे टीडीएम. ग्रामीण वास्तविक जीवनातील समस्येवर चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य करणारा दिग्दर्शक अशी भाऊरावची कऱ्हाडे यांची ओळख आहे.

चित्राक्ष फिल्म आणि स्माईल स्टोन स्टुडिओ प्रस्तुत टीडीएम कॉमेडी चित्रपटाची निर्मिती धुरा स्वतः भाऊराव कराडे यांनी सांभाळली असून चित्रपट कथा संवाद क्रीम प्ले ची जबाबदारी देवकते आणि भाऊरावांनी सांभाळली आहे. या चित्रपटात अभिनेता व इतर कलाकार नावं गुलदस्त्यात असून संगीताची बाजू वैभव शिरोळे व ओंकार स्वरूप बागडे यांनी पाहिली आहे. तमाम सिनेरसिक गाणं कधी ऐकायला मिळणार यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.

Post a Comment

0 Comments