28 वर्षांपूर्वी एकमेकांपासून दूरावलेल्या वर्गमित्रांची झाली भेट...


बार्शी |

अनेक वर्षे एकमेकापासुन दुर गेल्यावर माणसाची किंमत कळते.त्याच्यामधील आपुलकी,जिव्हाळा, प्रेम हे तेव्हाच ऊमगते.अगदी अश्याच प्रसंगास सामोरे जाण्याची वेळ आगळगाव ता.बार्शी येथे 28 वर्षापुर्वी एकत्र शिक्षण घेतलेल्या मात्र नंतर प्रसंगानुरूप एकमेकांपासुन दुरावलेल्या मित्रांवर आली. 1994 मध्ये दहावीच्या बोर्ड परिक्षेनंतर आयुष्याच्या वेगवेगळया वाटा शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या  वर्गमित्रांची तब्बल 28 वर्षांनी गळाभेट झाली. निमीत्त होते आगळगाव येथील 1994 बॅचच्या माजी विदयार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याचे. शालेय जीवनातील टोपण नावाने हाका मारत व आठवणींना उजाळा देत शाळेच्या माजी विदयार्थ्यांनी हा स्रेहमेळावा अविस्मरणीय केला.
    
उद्योजक नाना डमरे यांनी जुन्या मित्रांच्या स्नेहमेळाव्याची संकल्पना मांडल्यानंतर  वर्गमित्र पुणे विभागाचे शिक्षण संचालक औदुंबर उकिरडे,सोलापूरचे उद्योजक राहुल श्रीखंडे,अॅड हेमंत शिंदे,महेश उकिरडे,पत्रकार गणेश गोडसे, यांच्यासह ईतर सहकारी मित्रांनी या सुखद कार्यक्रमास होकार देत एकमेकांशी संपर्क साधला.एकंदर या प्रक्रियेस जेमतेम काही दिवसांचा कालावधी जावु द्यावा लागला. 
यावेळी दिपक माने, किरण माने,रावसाहेब डमरे,संपत जाधव,अमोल लंगोटे,सतिश बावकर,संतोष नलवडे,नितिन गिराम,संजय माळी,भाऊ गायकवाड, धनाजी जाधव,वैजिनाथ यादव,हणुमंत जाधव आदी उपस्थित होते. 

व्यवसाय, नोकरीच्या निमीत्ताने राज्यातील विविध शहरासह, परराज्यात स्थायिक झालेले अणेक गावातील वर्गमित्र या स्नेहमेळाव्याला हजर होते.
   28 वर्षानंतर एकमेकांच्या संपर्कात आलेल्या या सवंगड्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. अरे किती वर्षांनी भेटतोय असा हद्यस्पर्शी संवाद साधत एकमेकांशी मन मोकळे केले. काय करतोय सध्या ..? फोन सुध्दा करत नाही साधा..खूप मोठा झालास काय रे... ? असे संवाद यानिमीत्ताने घडले. सर्वच वर्गमित्रांनी  5 वी ते 10 वी पर्यंत शिक्षण कानातील शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. ज्या शाळेने आपल्यावर संस्कार केले त्या शाळेबद्दल, परिसराबद्दल प्रेम, जिव्हाळा प्रत्येकाच्याच बोलण्यातून व्यक्त होताना दिसुन येत होता. शालेय जीवनातील गमतीजमती, अनेक मजेशीर किस्से सर्वांनी एकमेकांना मुक्तपणे सांगितले. एकमेकांची खुशाली जाणून घेत ज्यांच्यामुळे आपण घडलो,ज्यांनी घडविले त्या गुरूजनांबद्दलही सर्वांनी आदर व्यक्त केला. शेती, शिक्षण, उदयोग, व्यापार  आदी  विभिन्न् क्षेत्रात आपल्या कार्याचा  ठसा उमटविलेल्या विदयार्थ्यांवर शिक्षकांनी केलेल्या संस्काराचे कौतुक केले.

शिक्षण  संचालक औदुंबर  उकिरडे यांनी वर्गमित्रांना शालेय,श्रीफळ, पेन,गुलाबपुष्प भेट दिले. स्नेहभोजनानंतर सूर्य ऊतरणीला लागला तसा निरोपाचा क्षण जवळ जवळ येऊ लागताच अणेकांना आजचा दिवस मावळुच नये असे वाटत होते. मात्र निसर्ग कोणासाठी थांबत नसल्यामुळे अखेर मित्रांना गप्पांचा फड आवरता घ्यावा लागला. चार तासांच्या पुढे रंगलेल्या या स्नेहमेळाव्याची अखेर पुन्हा पुढच्या वर्षी भेटण्याच्या आणा भाका झाल्यानंतर अखेर सांगता झाली. चल, भेटू पुन्हा,नक्कीचे हं...असे म्हणत सर्वच मित्रांनी भरल्या डोळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.

Post a Comment

0 Comments