भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे. ऋषी सुनक यांनी पेनी मॉर्डन यांचा पराभव केला. ऋषी सुनक यांना १८५ हून अधिक खासदारांचे समर्थन मिळाले.
तर पेनी मॉर्डन यांना २५ खासदारांचे समर्थन मिळाले. ऋषी सुनक यांना ब्रिटनच्या पंतप्रधान पदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला. ऋषी सुनक हे २८ ऑक्टोबर रोजी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून २९ ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळाची स्थापन करणार आहेत. अवघ्या सात महिन्यात ऋषी सुनक हे ब्रिटनचे तिसरे पंतप्रधान आहेत. जुलै महिन्यात ब्रिटनमध्ये लिझ ट्रस आणि ऋषी सुनक या दोघांमध्ये पंतप्रधान पदाची निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीत ट्रस यांचा विजय झाला होता. परंतु, जनतेला दिलेले आश्वासने पुर्ण करू न शकल्याने ट्रस यांना ४५ दिवसात राजीनामा द्यावा लागला. यानंतर पुन्हा एकदा ऋषी सुनक पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये उतरले. आणि यावेळी ऋषी सुनक यांना खासदारांचा पाठिंबा मिळाल्याने पंतप्रधान पदी विराजमान होण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
0 Comments