बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील महागाव येथे अज्ञात व्यक्तीने एसटी चालकास मारहाण करून दगड मारून २ हजार रुपयाचे नुकसान करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सचिन मच्छिंद्र भोसले वय ३२ एसटी चालक रा. रावळगाव ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात भादवि कलम ३२३, ३३२, ३५३,४२७,५०४,५०६ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे की, १९ मे रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान ब्रिजा कंपनीच्या गाडीचा ड्रायव्हर ने एसटी बस चालक सचिन भोसले याना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ड्रायव्हर साईटच्या काचेवर दगड मारून दोन हजार रुपयाचे नुकसान केले आहे, याप्रकरणी सरकारी कामात अडथळा म्हणून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जाधव हे करत आहेत, अशी माहिती पांगरी पोलिस कडून ठाण्याकडून प्रेस नोटच्या माध्यमातून देण्यात आले आहे.
0 Comments