अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग बँकेची निवडणूक भाजपने जिंकली. त्यानंतर पत्रकार परिषदेतून नारायण राणे यांनी अजित पवारांवर मिश्किल शब्दात टीका केली होती.याबाबत आज माध्यमांनी अजित पवारांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की,"सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणूकीत दुर्दैवाने महाविकास आघाडीला यश मिळाले नाही, ज्यांना यश मिळाले. त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. नारायण राणे हे केंद्रात मंत्री आहेत. एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा त्यांनी केंद्रातून निधी आणावा". अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोला लगावला आहे. तर आम्ही राज्याच्या माध्यमातून कोकणसाठी निधी उपलब्ध करुन देऊ, सर्वांनी मिळून कोकणचा कायापालट करु असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
0 Comments