बार्शी! खामगाव, कारी व येळंब अवैधरित्या दारू विक्री करणार्‍यावर कारवाई; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


बार्शी तालुक्यातील खामगाव, कारी व येळंब या गावांमध्ये कोणताही कायदेशीर परवाना नसता अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या तिघांवर पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांगरी पोलिस पेट्रोलिंग करत असताना विविध ठिकाणी अवैधरित्या विनापरवाना दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पांगरी पोलिसांनी तीन ठिकाणी छापे मारून 150,  900 व 940 रुपयाची दारू पांगरी पोलिसांनी जप्त करून जागीच नष्ट केली आहे. त्यानुसार 1)माणीक भालचंद्र काळे (वय 25) रा. परधीवस्ती महागाव , ता.बार्शी 2) अनिल भास्कर मुळे (वय 43) रा खामगाव ता बार्शी जि सोलापुर व 3) समाधान लक्ष्मण काळदाते (वय 43)  धंदा हाँटेल व्यवसाय रा. येळंब ता.बार्शी जि.सोलापूर या तिघाजना वर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) नुसार पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पांगरी पोलिस ठाण्याचे पोलिस साहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक नन्नवरे, पोलीस नाईक जाधव, पोलीस कॉन्स्टेबल दळवी यांच्या टीमने केली आहे.

Post a Comment

0 Comments