कोल्हापूर जिल्ह्यातील पेटवडगाव मध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्याच्यावर न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असते. तेच लाचखोरी करत असतानाचे चित्र दिसत आहे, मटक्याच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिसांनीच वीस हजारांची लाच मागितली पोलीस कॉन्स्टेबल सह लाचलुचपत पथकाच्या विभागाने दोघांना ताब्यात घेतले आहे. कॉन्स्टेबल अशोक कृष्णा जाधव (वय ३१, रा. पेठ वडगाव), त्याचा साथीदार चेतन गावडे (रा. कोरेगांव, ता. वाळवा, जि. सांगली) आणि प्रीतम दीपक ताटे (२१, रा. नवीन वसाहत, भादोले रोड, ता. हातकणंगले) या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मटका जुगाराच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि गुन्ह्याच्या एफआयआरची प्रत देण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल अशोक जाधव हा तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची मागणी करत होता. वडगाव पोलीस ठाण्याच्या डाव्या बाजूस असलेल्या चहाच्या टपरीवर सरकारी पंचांच्या समक्ष पोलीस कॉन्स्टेबल जाधव याने तक्रारदाराकडे गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि एफआयआरची प्रत देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच कॉन्स्टेबल जाधव याने त्याचा साथीदार चेतन गावडे याला स्वीकारण्यास सांगितली. त्यानंतर गावडे यानेही स्वत: लाच न स्वीकारता ही ५ हजार रुपयांची लाच प्रीतम ताटे याला स्वीकारण्यास सांगितली. तक्रारदारांकडून ताटे याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलं. या प्रकऱणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल शरद पोरे, पोलीस नाईक सुनील घोसाळकर, कॉन्स्टेबल मयूर देसाई, रुपेश माने यांनी कारवाईत भाग घेतला.
0 Comments