परंडा/प्रतिनिधी:
दिनांक 2 ऑक्टोबर 2021रोजी यशस्विनी सामाजिक अभियानाच्या राज्य समन्वयक तथा पीसीपीएनडीटी चा राज्य सदस्य वैशालीताई राहुल मोटे यांनी मौजे टाकळी तालुका परांडा व परंडा शहरातील अशा दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेल्या घटनेसंदर्भात आज परंडा पोलीस स्टेशन येथे येऊन प्रथम पीडित मुलींची चौकशी करून, डॉक्टरांना भ्रमणध्वनीद्वारे फोन करून तिच्या आरोग्याबाबत सर्व विचारपूस केली, जाई वडिलांशी नातेवाइकांशी चर्चा करून व प्रत्यक्ष मुलीशी चर्चा करून तिचे मनोबल वाढविण्याचे प्रयत्न केला. तपासाधिकारी बिराजदार साहेब यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून दोन्ही प्रकरणातील आरोपी विरुद्ध कठोर पावले उचलून शिक्षा करण्यासंदर्भात सूचना केल्या.
परंडा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्याशीही चर्चा करून पीडित दोन्ही बालिकांना न्याय मिळवून देण्यासाठी व आरोपीला कठोर शिक्षा होण्यासंदर्भात कारवाई करण्यासंदर्भात सूचना केली. त्या संदर्भातील निवेदन ही गिड्डे साहेबांना देण्यात आले.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला तालुकाध्यक्ष स्वाती हनुमंत गायकवाड, यशस्विनी सामाजिक अभियानाच्या तालुका समन्वयक राखी देशमुख, नगरसेविका रत्नमाला राहुल बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्ष, संजना माने, राष्ट्रवादी काँग्रेसची च्या युवती तालुकाध्यक्ष प्रियंका बाबुराव काळे कु. हावळे, कु. बनसोडे तसेच सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, जिल्हा मजूर फेडरेशन संचालक बापू मिस्कीन, टाकळी चे सरपंच मनोज काळे, अजय बनसोडे, घनश्याम शिंदे, नंदू शिंदे, श्रीहरी नाईकवाडी, प्राचार्यआदी उपस्थित होते हनुमंत यादव, प्रा. शरद झोंबाडे., काळे सर, पटेल सर, व महिला आदी उपस्थित होत्या.
0 Comments