अखेर समंथा आणि नागा चैतन्यने घेतला घटस्फोटचा निर्णय!


साऊथची फेमस जोडी समंथा अक्खीनेनी आणि नागा चैतन्या यांनी अखेर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. समंथाने स्वतः इन्स्टाग्राम पोस्ट शेअर याबद्दलची पुष्टी केली आहे.

यांच्यामध्ये गेली अनेक दिवस खटके उडत असल्याचं म्हटलं जात होतं. काही दिवसांपूर्वी असं म्हटलं जात होतं की समंथा नागा चैतन्यचा घर सोडून आपल्या वडिलांच्या घरी शिफ्ट झाली आहे.आज अखेर अभिनेत्रीने अधिकृतपणे या गोष्टीला जाहीर केलं आहे.

नुकताच अभिनेत्री समंथा अक्खीनेनीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिनं म्हटलं आहे. ‘मी आणि चायने (नागा चैतन्य) अत्यंत विचार करून हा निर्णय घेतलाआहे. तोच तुमच्याशी शेअर करत आहे. मी आणि चायने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आमचे वैयक्तिक मार्ग अवलंबण्यासाठी या पती-पत्नीच्या नात्यातून विभक्त होण्याचं ठरवलं आहे.

आम्ही एक दशकाहुन अधिक काळ मित्र आहोत यातच आम्ही स्वतःला नशीबवान समजतो. मैत्री हाच आमच्या नात्याचा मुख्य गाभा होता. मात्र आम्ही आता स्वतंत्र मार्ग निवडले आहेत. आम्ही आमच्या हितचिंतकांना, चाहत्यांना आणि माध्यमांना विनंती करतो की या कठीण काळात आमच्यासोबत राहा. आणि आम्हाला थोडी प्रायव्हसी द्या’.

गेली अनेक दिवस सोशल मीडियावर समंथा आणि नागा चैतन्य यांच्यामध्ये सर्वकाही ठीक नसल्याच्या चर्चा सुरु होत्या. इतकंच नव्हे तर हे दोघे एकमेकांपासून विभक्त राहत असून लवकरच घटस्फोट घेणार असल्याचंही म्हटलं जात होतं. समंथा आणि नागा चैतन्य दोघेही साऊथमध्ये खूपच प्रसिद्ध कलाकार आहेत.

त्यांचा चाहतावर्गदेखील फार मोठा आहे. त्यामुळे अशा चर्चांमुळे चाहत्यांमध्ये नाराजी दिसून येत होती. मात्र आज अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट पाहून अनेक चाहत्यांची मन तुटली आहेत. नागा आणि समंथाने ४ वर्षांपूर्वी गोव्यामध्ये डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं.

Post a Comment

0 Comments