'नथुराम गोडसेवर' सिनेमा काढण्याची घोषणा महेश मांजरेकरने केली गांधी जयंती दिवशी


नथुराम गोडसेवर सिनेमा काढण्याची घोषणा महेश मांजरेकरांनी आज गांधी जयंतीच्या दिवशी केलेली आहे. महेश मांजरेकरांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच व मी त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करतो. वस्तुस्थिती दाखविणारा सिनेमा त्यांनी जरूर काढावा माझा त्यांना पाठिंबा आहे. घटनेतील कलम 19 {2} नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य वाजवी बंधनांसह वापरायचे असते याचे त्यांनी भान ठेवले तर मी वकील म्हणून सुद्धा महेश मांजरेकर यांच्यासोबत राहीन. 

(Advertise)

नथुरामचे व त्याच्या गुन्ह्याचे उदात्तीकरण आणि खोटेनाटे दाखविल्याशिवाय असा चित्रपट पूर्ण होणे शक्यच नाही हे सुद्धा मला माहिती आहे. सावरकरांनी सांगितल्यानुसारची अनेक पानेच्या पाने नथुरामने कोर्टात वाचून दाखविली होती म्हणतात. त्या अर्थाने नथुराम हा सावरकरांचा ' पोपट ' च होता असे म्हणावे लागेल.  

महेश मांजरेकरांना चित्रपट व्यवसाय बरोब्बर कळतो त्यामुळे असली बाजारू घोषणा त्यांनी नेमकी गांधी जयंतीच्या दिवशी केली आहे. याआधी 'वीर' म्हणून लेप लावलेल्या व्यक्तीवर सिनेमे काढले गेले पण ते डब्ब्यात गेले. बायोपिक्स च्या संदर्भात सिनेमॅटिक संकल्पनेचा अधिकार म्हणून अभिव्यक्तीचा गैरवापर करणे थांबेल तेव्हा देशातील सिनेमांचा दर्जा वाढेल. 

© असीम सरोदे

Post a Comment

0 Comments