हरियाणा येथे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिलेल्या करमाळ्यात युवकाचा आकस्मिक मृत्यू


करमाळा/प्रतिनिधी:

हरियाणा येथे धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या करमाळा येथील धावपटूचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  बंडू दत्तात्रेय वाघमोडे याचा धावण्याच्या स्पर्धे दरम्यान मुत्यू झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार हृदयविकाराने बंडू वाघमोडे याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे करमाळा येथे बुधवारी रात्रीपर्यंत बंडू वाघमोडे यांचा पार्थिव आणला जाणार आहे.

करमाळा येथीलश्री कमलादेवी स्पोर्टस्‌ क्‍लबमध्ये बंडू वाघमोडे धावण्याचा सराव करत असे. बंडू वाघमोडे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. बंडु वाघमोडे हा दहा युवकांसोबत धावण्याच्या स्पर्धेसाठी हरियाणा राज्यातील महक येथे गेला होता. १९ सप्टेंबर रोजी बंडू वाघमोडे धावण्याच्या स्पर्धेत धावत असताना तो कोसळला व त्याचा मृत्यू झाला. 

(Advertise)

बंडू वाघमोडे आपल्या परिवारास निलज येथे राहत होता दत्तात्रय वाघमारे हे त्याचे वडील मेंढी पाळण्याचा व्यवसाय करतात. त्यांना बंडू व नामदेव अशी दोन मुले व दोन मुली आहेत. बंडू हा श्री कमलादेवी स्पोर्ट्स क्लब मध्ये सरावासाठी जात असे मात्र स्पर्धेदरम्यान बंडू वाघमोडे याचा मृत्यू झाल्यामुळे वाघमोडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments